प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण-कारवार मार्गावर माशे येथे एका स्विफ्ट कारला अपघात होऊन कारचे नुकसान झाले. सुदैवाने मनुष्यहानी टळली. त्याचवेळी माशे येथील नीलेश प्रभुदेसाई, सर्वेश सतरकर आणि गोविंद सतरकर हे नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि कारमध्ये अडकलेल्या चालकाला सहिसलामत त्यांनी बाहेर काढले. काणकोणच्या पोलिसांनी लगेच येऊन पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.