बेळगाव/प्रतिनिधी
मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी अनगोळ येथे ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
विकास संजीव मोगेरा (वय 14, रा. अनगोळ) असे त्या बालकाचे नाव आहे. आपल्या अन्य तीन मित्रांसमवेंत तो तलावात मासे पकडण्यासाठी जात होता. त्यावेळी विद्युत भारीत तार तुटून नाल्यात पडल्यामुळे पाण्यात विजेचा प्रवाह सुरू होता. विकासने नाल्यात पाय ठेवताच वीजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. पोलीस निरीक्षक एम. वाय. कारीमनी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.