वार्ताहर/ संगमेश्वर
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱयांवर कारवाईचा बडगा उभारला जात आहे. संगमेश्वर बाजारपेठेत मास्क न लावता फिरणाऱयांवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळपासून मास्क न वापरणाऱयांवर कारवाईला सुरुवात केल्याने बाजारपेठेत मास्क न वापरता फिरणाऱयांची एकच धावपळ झाली. संगमेश्वर पोलिसांनी मास्क न वापरता फिरणाऱया 8 जणांवर कारवाई केली आहे.
कोरानाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून सर्वच ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. बाजारपेठेत गर्दी करुन फिरणाऱयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असताना अजुनही मास्क न वापरता फिरणाऱयांची संख्या जास्त आहे. मात्र बाजारपेठेत मास्क न वापरता फिरणाऱयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संगमेश्वर बाजारपेठेत मास्क न वापरता फिरणाऱया 8 जणांवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली.
बुधवार हा संगमेश्वरचा आठवडा बाजार असतो. मंगळवारी कारवाई केल्यानंतर बुधवारी आठवडा बाजारात अनेक जण मास्क न वापरता आले होते. तसेच मोठया प्रमाणात गर्दी केली होती. संगमेश्वर बाजारपेठेत ठराविक ठिकाणी फिरणाऱयांवर कारवाई मात्र गर्दी करुन आणि मास्क न वापरता फिरणारे अधिक होते. त्यामुळे मास्कबाबत कारवाई करताना सरसकट कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधूनच होत आहे.