महामारीच्या काळात बंम्पर कलेक्शन
पवन कल्याण यांचा ‘वकील साब’ चित्रपट फर्स्ट वीकेंड कलेक्शनप्रकरणी विजय आणि विजय सेतुपति यांच्या ‘मास्टर’पेक्षाही वरचढ ठरला आहे. वकील साब हा महामारीच्या काळात पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसात सुमारे 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जानेवारीत प्रदर्शित मास्टरने तीन दिवसात 69 कोटींचा गल्ला जमविला होता.
महामारीदरम्यान फर्स्ट वीकेंड कलेक्शनच्या पहिल्या 10 चित्रपटांच्या यादीत एकही हिंदी चित्रपट नाही. पण याचे मोठे कारण कुठलाही बिगबजेट चित्रपट प्रदर्शित न होणे हे देखील आहे. तसेच प्रदर्शित झालेले चित्रपट 50 टक्के प्रेक्षकांच्या क्षमतेसह खुल्या राहिलेल्या चित्रपटगृहांमध्येच झळकले आहेत. यातही केवळ जान्हवी कपूर, राजकुमार राव यांचा ‘रुही’ चित्रपटच वीकेंड कलेक्शनमध्ये 10 कोटी रुपयांचा आकडा ओलांडू शकला होता.
टॉप 10 वीकेंड ग्रॉसर्स भारतीय चित्रपट
स्थान चित्रपट वीकेंड कलेक्शन
1 वकील साब (तेलगू) 70 कोटी रुपये
2 मास्टर (तमिळ) 69 कोटी रुपये
3 रॉबर्ट (कन्नड) 31 कोटी रुपये
4 उप्पेना (तेलगू) 30.50 कोटी रुपये
5 पुगारा (कन्नड) 23 कोटी रुपये
6 कर्णन (तमिळ) 20 कोटी रुपये
7 क्रॅक (तेलगू) 18.50 कोटी रुपये
8 युवास्थाना (कन्नड) 18.50 कोटी रुपये
9 रेड (तेलगू) 18 कोटी रुपये
10 सुलतान (तमिळ) 17.50 कोटी रुपये