शिरोळ प्रतिनिधी
गहाण ठेवलेले घर सोडवण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये.. तुझ्यामुळेच माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे.. हे बाळ कोणाचे आहे कोणास ठाऊक.. यासह अन्य कारणाने शारीरिक व मानसिक छळ केली असल्याची फिर्याद भावना उर्फ माधुरी पंकज सायल (वय वर्ष 30 रा. दिन बंधू हौसिंग सोसायटी, जयसिंगपूर) यांनी पती सासू सासरे यांच्यासह आठ जणांच्यावर शिरोळ पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की; 29 मे 2018 पासून आज अखेर फिर्यादी भावना सायल हीला पती पंकज सायल, सासरे वसंत सायल, सासू जयश्री सायल, चुलत सासू रोहिणी कांबळे, जोशना कांबळे, जयश्री कांबळे, प्रियांका झेंडे अशोक कांबळे सर्व रा.शाहूनगर,शिरोळ यांनी घरातील कामाबरोबरच चुलत सासूच्या घरातील सर्व कामे करून घेणे, गहाण ठेवलेले घर सोडवून घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये रोख घेऊन ये तुझ्यामुळेच माझ्या वडिलांना अटॅक आला आहे हे बाळ कोणाचे आहे तुलाच ठाऊक आहे असे वाईट बोलून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, घरातून हाकलून लावणे तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. याविरोधात वरील संशयित सर्व आरोपी विरोधात फिर्याद देण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक ए. ए. पाटील या करीत आहेत.