जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकातील माहेश्वरी समाजाची नेंद प्र-वर्गामध्ये करावी तसेच भाषिक अल्पसंख्याक व एक समुदाय म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी माहेश्वरी समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कर्नाटकात माहेश्वरी समाजाची 2 हजार 609 कुटुंबे आहेत. जवळपास 14 हजार 599 लोकसंख्या असलेला हा समुदाय आहे. शिवभक्त म्हणून या समाजाकडे पाहिले जाते. विविध राज्यांमध्ये छोटय़ा-मोठय़ा नोकऱया तसेच लहान व्यवसाय करत हा समाज अत्यंत शांततेत राहतो. सर्वांच्या सुख-दुःखामध्ये सामील होऊन राज्याच्या विकासासाठी हातभार लावतो.
माहेश्वरी समाज हा गरीब आणि मध्यमवर्गामध्ये मोडतो. त्यामुळे या समाजाला सरकारी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला तसेच प्रवर्ग असल्याचे जात प्रमाणपत्र मिळाले तर निश्चितच या समाजाला सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. मात्र, अद्याप याबाबत सरकारने गांभीर्याने घेतले नाही. तेव्हा तातडीने माहेश्वरी समाजाला प्र-वर्गामध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी विशेष योजना लागू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोक चिंडक, सचिव पुरुषोत्तम भट्टड, राजेंद्र मुंदडा यांच्यासह नागरिक उपस्थित होते..