नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाचे मिग-21 बायसन विमान बुधवारी सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. मध्य भारतातील एका हवाई तळावरुन सरावासाठी उड्डाण घेतल्यानंतर मिग-21 बायसन विमान कोसळले. या दुर्घटनेत एका ग्रुप कॅप्टनचा मृत्यू झाला असून हवाई दलाकडून ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता असे हुतात्मा झालेल्यांचे नाव आहे. हवाई दलाने या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असेही स्पष्ट केले आहे.