वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बंगालचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज त्याचप्रमाणे मिझोरामच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक मुर्तझा लोधगर यांचे वयाच्या 45 व्या वर्षी शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
विशाखाट्टणम् येथे मिझोरामच्या युवा क्रिकेट संघाला ते मार्गदर्शन करीत होते. मिझोरामचा 19 वर्षाखालील युवा क्रिकेट संघाचा आगामी विनू मंकड करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी ते सराव करवून घेत होते. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत त्यानी बंगाल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. रणजी स्पर्धेत लोधगारने 9 सामन्यांतून 34 बळी मिळविले आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे तसेच बंगालचा माजी कर्णधार दीप दासगुप्ता, बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी लोधगर यांना श्रद्धांजली वाहिली.