ऑनलाईन टीम / ऐझॉल :
मिझोराममध्ये आज सकाळी 9.03 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल एवढी होती. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू लुंगलेई होता. भूकंपाने कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.