वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या वनडे ताज्या मानांकन यादीत फलंदाजांमध्ये भारताची फलंदाज मिताली राजने आपले सातवे स्थान शाबूत राखले असून स्मृती मानधनाने आपले नववे स्थान कायम राखले आहे.
महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची ऍलीसा हिली पहिल्या स्थानावर असून इंग्लंडची नताली स्किव्हेर दुसऱया स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या झुलन गोस्वामीने पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ब्रिटनची इक्लेस्टोन पहिल्या, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल दुसऱया तर ऑस्ट्रेलियाची जोनासेन तिसऱया स्थानावर आहेत.