वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने सोमवारी आयसीसीने घोषित केलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकनात पुन्हा अग्रस्थान पटकाविले आहे. या मानांकन यादीत मिताली राज 762 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर भारताची डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाने नववे स्थान मिळविले आहे.
तब्बल 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मिताली राजने आयसीसा मानांकनात आतापर्यंत नऊवेळा अग्रस्थान मिळविले आहे. या ताज्या मानांकन यादीत विंडीजची कर्णधार स्टीफेनी टेलरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
वनडे गोलंदाजांच्या मानांकनात भारताच्या झुलन गोस्वामीने पाचवे स्थान मिळविले आहे तसेच महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या स्मृती मानधनाने तिसरे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत दीप्ती शर्मा पाचव्या स्थानावर आहे.