नवी दिल्ली
शॉर्ट व्हिडीयो ऍप मित्रों टीव्हीने येणाऱया 6 महिन्यांच्या कालावधीत वापरकर्त्यांची संख्या दुप्पट म्हणजेच 10 कोटी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कंपनीला अस्तित्वात येऊन वर्ष झालं आहे. टिकटॉकसह अन्य चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारतातील स्थानिक स्तरावरील ऍप्सना भारतीयांनी पसंती दर्शवली आहे. मित्रों टीव्हीचे संस्थापक तथा सीईओ शिवांक अग्रवाल यांनी सांगितले की, पहिले वर्ष हे कंपनीसाठी खूप आशादायी राहिलं आहे. आमचे ऍप सहजपणे 5 कोटीवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.