वृत्तसंस्था/ अर्लीन्स (फ्रान्स)
येथे झालेल्या अर्लीन्स मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मिथुन मंजुनाथला पुरूष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हने मंजुनाथचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या चौथ्या मानांकित पोपोव्हने भारताच्या 23 वर्षीय मंजुनाथचा 50 मिनिटांच्या कालावधीत 21-11, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. भारताच्या मंजुनाथने सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मंजुनाथ हा प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीचा बॅडमिंटनपटू आहे. मिथुन मंजुनाथने आपल्या वैयक्तिक बॅडमिंटन कारकीर्दीत अखिल भारतीय मानांकन स्तरावरील चार बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत.