प्रतिनिधी/ सातारा
sजिह्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून गेल्या वर्षात काल 15 एप्रिल रोजी 1184 हा रेकॉर्डब्रेक रूग्णवाढीचा आकडा समोर आला. हा धक्का सहन करण्याची उसंतही मिळाली नसताना शुक्रवारी जिल्हा हादरवणारी 1395 रूग्णवाढ झाली. गत 24 तासात वाढलेली रूग्णसंख्या पाहता जिह्यात दर मिनिटाला नवा एक रूग्ण वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा धोक्याची पातळी ओलांडून पुढे निघाला असताना काही नागरिकांचा बिनधास्तपणा अन प्रशासनाची हतबलता हजारो लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची उद्विग्नग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी जिल्हय़ात भाजी मंडई बंद करण्याचा विचार प्रशासन करत असून फिरून भाजी विकता येणार आहे. जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1395 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 15 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
24 तासात 6 हजार 423 चाचण्या
जिह्यात कोरोना महामारीने उच्चांक गाठला असून गेल्या 24 तासात 6 हजार 423 संशयितांच्या चाचण्या केल्या आहेत. सर्वात जास्त 3434 रॅपीड ऍण्टीजन टेस्ट केल्या असून त्यापैकी 862 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर 2989 चाचण्या केल्या असून त्यापैकी 533 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात 1685 चाचण्या केल्या असून पैकी 358 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमधे 1153 चाचण्या केल्या असून 113 पॉझिटिव्ह आले आहेत. कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात 151 संशयितांच्या चाचण्या केल्या असून 62 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 6 हजार 423 चाचण्या झाल्या असून 1395 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट 21.72 आहे.
सातारा तालुक्यात सर्वाधिक 319 रूग्ण
सकाळी आलेल्या अहवालात सातारा तालुक्यात 319 रूग्ण असून शहर व परिसरात 182 आहेत. फलटणला 185, कराडला 150, वाई 100, कोरेगावला 85, खटावला 98, माणला 83, पाटण 23, खंडाळा 78, जावली 36 असे रूग्ण वाढले आहेत.
दहापेक्षा जास्त रूग्णांचे हॉटस्पॉट वाढले
जिह्यात कोरोना महामारीचा वेग भितीदायक वाढत असताना दररोज नव्या गावाला विळखा पडत आहे तर काही गावांतील रूग्णांमधे चिंताजनक वाढ होत आहे. सातारा शहर व परिसरात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून आजच्या आकडेवारीत सातारा शहर व परिसरात 182 रूग्ण वाढले आहेत. त्यात सदरबझार येथे 12 तर वर्णे गावात 19 रूग्ण वाढलेत. कराडला शहरात 30 रूग्ण वाढले असून मलकापूर-आगाशिवनगरला 16 रूग्ण तर हजारमाचीला तब्बल 11 रूग्ण वाढलेत. सैदापूर-विद्यानगरला 14 रूग्णांची वाढ झाली आहे. फलटण शहरावर कोरोनाचे सावट कायम असून मलठण गावात 20 रूग्ण तर लक्ष्मीनगर भागात 10 रूग्णांची वाढ झाली आहे. खटाव तालुक्यातील स्थितीही बिकट असून पुसेगांवात नवे 11 तर बोंबाळे गावात 15 रूग्ण आढळलेत. माण तालुक्यातही दहिवडीत 17 रूग्ण वाढले असून पानवन गावात 21 रूग्ण आढळले आहेत. कोरेगांव शहरात 22 तर वाठार स्टेशनला 10 रूग्ण आढळले आहेत. वाई तालुक्यात बावधनचे बगाड यात्रेची गर्दीमुळे रूग्णवाढ होतच असून त्यात 32 नव्या रूग्णांची भर पडली आहे. खंडाळा शहरात 11, शिरवळला 22, लोणंदला 16 तर अंधोरीला 11 रूग्ण आढळले आहेत. पाचगणीत नव्या 18 रूग्णांची भर पडली आहे.
जिह्यात 15 बाधितांचा मृत्युङ स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे चव्हाणवाडी (ता. सातारा) येथील 52 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 69 वर्षीय पुरुष, सदरबझार (सातारा) येथील 50 वर्षीय महिला, विसापूर (ता. खटाव) येथील 72 वर्षीय पुरुष, वळसे (ता. सातारा) येथील 81 वर्षीय पुरुष, नरवणे (ता. माण) येथील 64 वर्षीय पुरुष, वर्धनगड (ता. खटाव) येथील 62 वर्षीय पुरुष, व जिह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये मोरेवाडी (ता. पाटण) येथील 66 वर्षीय पुरुष, कोथरुड (जि. पुणे) येथील 39 वर्षीय पुरुष, जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील 50 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले होळीचागाव (ता. खटाव) येथील 70 वर्षीय महिला, विठ्ठलवाडी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय महिला, खडकी जि. पुणे येथील 69 वर्षीय पुरुष, सदरबझार (सातारा) येथील 78 वर्षीयपुरुष, परमाळे आसनगाव (ता. सातारा) येथील 71 वर्षीय पुरुष अशा एकूण 15 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला