वेंगुर्ले-नवाबाग व मांडवीजेटीच्या ठिकाणी पकडलेल्या 6 मिनी पर्सनेट मच्छिमारी नौकांवर वेंगुर्ले तहसिलदारांकडून 86,900 रूपयांची दंडात्मक कारवाई
वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले मांडवी खाडी जेटी व नवाबाग जेटी येथे निमी पर्सनेटव्दारे मासेमारी करून आलेल्या 6 नौकांवर वेंगुर्लेतील मत्स्यखात्याचे परवाना तथा अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनयिमन 1981 चे कलम 16 (अ) नुसार वेंगुर्ले तहसिलदार यांचे न्यायालयात सादर केलेल्या प्रकरणांत मासळीच्या लिलाव रकमेच्या 5 पट दंड म्हणजे एकूण 86,900 रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. या 6 जणांवर सोमवारी वेंगुर्ले तहसिलदार यांचे न्यायालयात दंडात्मक कारवाईसाठी प्रकरणे सादर केली होती.पर्सनेटव्दारे मासेमारीस बंदी असताना नौकाव्दारे मिनीपर्सनेटच्या माध्यमातून मासेमारी करून वेंगुर्ले मांडवीखाडी जेटी व नवाबाग जेटी येथे 6 नौकांवर कारवाईसाठी वेंगुर्लेतील मlस्यखात्याचे परवाना तथा अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनयिमन 1981 चे कलम 16 (अ) नुसार प्रकरणे वेंगुर्ले तहसिलदार यांचे न्यायालयात सादर केली होती. या प्रकरणांची सुनावणी होऊन `साईरथ’ नौकेचे मालक सुधाकर रामचंद्र वेंगुर्लेकर यांना रूपये 5 हजार, `कान्हाची कृपा’ या नौकचे मालक अनंत वासुदेव केळूसनर यांना 4,990 रूपये, `कुलस्वामिनी’ या नौकचे मालक गुंडू मधुकर खोबरेकर यांना 4,800 रूपये, `अनुराधा’ या नौकचे मालक आनाजी रामचंद्र तांडेल यांना 4,800 रूपये, `मसिहा’ या नौकचे मालक मोजेस रूबेट फर्नाडीस यांना 4,810 रूपये तर `म्हाळसाई’ या नौकचे मालक सुरेश बाबुराव पडते यांना 62,500 रूपये अशी दंडात्मक कारवाई वेंगुर्ले तहसिलदार प्रवीण लोकरे यांचे न्यायालयाने केली आहे. या दंडाची रक्कम शासनाच्या महसुल विभागाकडे जमा करून घेण्यात आली आहे.