साहित्य : अर्धी वाटी ज्वारी पीठ, अर्धी वाटी किसलेली काकडी, 1 कांदा बारीक चिरून, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, चवीपुरते मीठ, 1 चमचा दही, चिमुटभर हळद पावडर, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आवश्यकतेनुसार, ग्रीन चटणी आवश्यकतेनुसार
कृती : बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. आता त्यात किसलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ, दही, हळद पावडर आणि कोथिंबीर टाकून मिश्रण मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून डोशाच्या पीठाप्रमाणे बॅटर तयार करून घ्यावे. आता उत्ताप्पा पॅन मंद आचेवर गरम करून त्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवून घ्यावे. नंतर त्यावर चमचाभर ज्वारीचे मिश्रण ओतून त्याला गोलाकार आकार द्यावा. कडेने तेलाचे थेंब सोडून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर भाजावे. आता तयार ज्वारी मिनी पॅनकेक तयार ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्यावे.