नियमांचे काटेकोर पालन करा : जिल्हा बंदी नाही, मात्र कोरोना टेस्ट बंधनकारक – जिल्हाधिकारी
- जिल्हय़ात 940 बेड उपलब्ध
- दोन दिवस अत्यावश्यक सेवाच सुरू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातही आता कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. जिल्हय़ातील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना बंदी घातलेली नाही. मात्र येताना किंवा आल्यावर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. जिल्हय़ातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 940 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते.
प्रथमच एका दिवसांत रुग्णसंख्या शंभरीपार
जिल्हय़ात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच एका दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे, हे स्पष्ट झाले आहे. ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.
लॉकडाऊनचे नियम पाळावेच लागतील!
कोरोना रोखण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी मिनी लॉकडाऊन लागू करून निर्बंध घातले आहेत. त्यात कसलीही सूट मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये दिल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत, ते जशाच्या तसे लागू केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना मिनी लॉकडाऊनचे कडक नियम पाळावेच लागतील. त्यात सूट मिळणार नाही. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी जागरुक राहून नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
दोन दिवस फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू
दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी आहे. त्याचे पालन करावेच लागणार आहे. मात्र वाहतूक सेवा सुरुच राहणार आहे. शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. त्या दिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, तर ऑटोरिक्षांना अपवादात्मकरित्या सेवा सुरू ठेवता येणार आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना बंदी नाही
जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना कुणालाही बंदी घातलेली नाही. मात्र जिल्हय़ात येताना किंवा जिल्हय़ात आल्यावर प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. लग्न सभारंभ करताना प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवत असताना त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. जिल्हय़ातील सर्व व्यापाऱयांनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.
साधेपणाने सण साजरे करा!
एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती आहे. हे सर्व कार्यक्रम व सण साधेपणाने साजरे करावेत. पुष्पहार अर्पण करताना दोन-चार व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अर्पण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हय़ात 940 बेड उपलब्ध
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक तालुक्मयात कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हा रुग्णालयात 287, तर सर्व तालुक्मयात 653 मिळून एकूण 940 बेड उपलब्ध आहेत. तसेच जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सक्रिय 725 रुग्णांपैकी 345 रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत, तर 380 रुग्ण जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत आहेत.
विनंती वजा आदेश – पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाने लागू केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नियमांचे पालन केले नाही, तर पोलीस अतिरेक करणार नाहीत. परंतु विनंती करून नियम पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. मात्र विनंती करूनही नियमांचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.
0 ते 30 वयोगटातील फक्त 1263 पॉझिटिव्ह रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 7 हजार 661 रुग्ण आढळले. त्यामध्ये 0 ते 30 वर्ष वयोगटातील फक्त 1263 रुग्ण आढळलेले आहेत. तर 30 वर्षांवरील 6 हजार 398 रुग्ण आढळले आहेत. 1 एप्रिलपासून आतापर्यंत गेल्या सात दिवसात 0 ते 30 वर्ष वयोगटातील 166 रुग्ण आढळले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनाने 192 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 60 वर्षांवरील रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. “085bfaf21e1830c4e2e5c27b7a3db