वृत्तसंस्था/ मियामी
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने चालू आठवडाअखेरीस सुरू होणाऱया मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून तंदुरूस्तीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे.
सेरेना विल्यम्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. तसेच 39 वर्षीय सेरेनाने यापूर्वी आठवेळा विक्रमी मियामी टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेतून आता सर्बियाचा जोकोव्हिच, स्पेनचा नदाल आणि स्वीसचा फेडरर यांनीही यापूर्वी माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.