वृत्तसंस्था / मियामी (अमेरिका)
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या मियामी खुल्या महिलांच्या हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वायटेकने एकेरीचे जेतेपद पटकाविताना जपानच्या नाओमी ओसाकाचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वायटेकने ओसाकाचा 6-4, 6-0 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. स्वायटेकचे अलिकडच्या कालावधीतील हे सलग तिसरे विजेतेपद आहे. स्वायटेकने आतापर्यंत सलग 17 सामने जिंकले आहेत. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्वायटेकने ओसाकाचा 80 मिनिटात पराभव केला. 2022 च्या टेनिस हंगामामध्ये स्वायटेकने डब्ल्युटीए टूरवरील इंडियन वेल्स आणि मियामी 1000 स्पर्धा जिंकल्या आहेत, अशी कामगिरी करणारी स्वायटेक ही चौथी महिला टेनिसपटू असून यापूर्वी जर्मनीच्या स्टेफी ग्राफ (1994 व 1996), किम क्लिस्टर्स (2005), बेलारूसच्या अझारेंका (2016) यांनी असा पराक्रम नोंदविला होता.