मिनी पर्ससीनला 50 ते 60 लाखांची मासळी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिनी पर्ससीन नौकांना ढोमी ही मासळी मुबलक प्रमाणात मिळत असून मागील 4 ते 5 दिवसात 50 ते 60 लाख रुपयांचा ढोमी मिळाल्याची माहीती मच्छीमारांनी दिली आह़े पारंपारिक पध्दतीने किनाऱयावरून मारल्या जाणाऱया रापणीलाही 1 ते दीड लाखाचा ‘रिपोर्ट’ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
ढोमी हा मासा निर्यात होत़ो गेल्या काही दिवसात सुमारे 120 रु प्रतिकीलो दराने हा मासा विकला गेल़ा मिरकरवाडा बंदरात मिनी पर्ससीन नौकांना ही मासळी मोठय़ा प्रमाणात मिळत आह़े अनधिकृतपणे मासेमारी करून मोठय़ा प्रमाणात जलद गतीने ढोमी पकडला जात असल्याने अधिकृतपणे मासेमारी करणाऱया पारंपारीक, टालिंग, गीलनेटधारकांना मात्र हा मासा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पारंपरिक मच्छिमारांकडून संताप व्यक्त केला जात आह़े
काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे नजीकच्या समुद्रात मासेमारी करणाऱया मिनी पर्ससीन नौकेला ही मासळी मिळाल़ी ही मासळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होती की, या नौकेच्या मालकाने अन्य पर्ससीन नौकांना बोलावून घेत या मोठय़ा साठय़ावर डल्ला मारला. त्यामुळे अवैध मिनी पर्ससीन नौकांना हंगाम पावल्याची चर्चा होत़ी याचवेळी दाभोळ नजीकही मच्छीमारांना ढोमी मासा मोठय़ा प्रमाणावर सापडला. त्यामुळे एकाच दिवसात मिरकरवाडा बंदरात सुमारे 50 ते 60 लाखांचा ‘रिपार्ट’ मिळला.
गेल्या काही दिवसात पारंपरीक मच्छीमारांनाही रापणीत मोठय़ा प्रमाणावर ढोमी मासा सापडू लागला आहे. एका रापणीला 1 ते दिड लाखापर्यंतचा ढोमी मिळत असल्याने या मच्छीमारामध्येही समाधान व्यक्त होत आहे.
मच्छीमारांची सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धडक
अवैध मासेमारीबाबत अधिक कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक महिला मिरकरवाडा जेटीवरच मासळी विक्री करत असल्यामुळे बंदरावर होणारी वाहतूक कोंडी संपवावी यासाठी मच्छिमार आक्रमक झाले आहेत. या प्रश्नांसह पथदीप व बंदरावर पुरेशी प्रकाश योजना आदी समस्याबाबत जाब विचारण्यासाठी मच्छीमारांनी मत्स्य कार्यालयावर धडक दिल़ी यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांनी मच्छीमारांना या समस्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल़े