डोक्यावर, छातीवर मारेकऱयाकडून घाव
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मिरकरवाडा येथे नेपाळी खलाशाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े सुनील जितलाल चौधरी (24, ऱा कुवे लांजा) असे मृत खलाशाचे नाव आह़े शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथे सुनील याचा मृतदेह आढळला होत़ा सुनीलच्या डोके व छातीवर कोणत्यातरी वस्तूने जोरदार प्रहार करून ठार मारण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा मिरकरवाडा येथील मच्छीमार हनिफ वस्ता यांच्या बोटीवर खलाशाचे काम करत होत़ा शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास सुनील हा शौचालयाला जातो, असे आपल्या सहकाऱयांना सांगून निघून गेला होत़ा दरम्यान शनिवारी सकाळी मिरकरवाडा जेटीकिनारी सुनील याचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला होत़ा या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा घातपाताचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत होत़ा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवल़ा यावेळी सुनील याचा मृत्यू हा डोक्यावर व छातीवर असलेल्या दुखापतीमुळे झाला असल्याचे शवविच्छेनात समोर आल़े या प्रकरणी सुनील याचा भाऊ प्रकाश जीतलाल चौधरी (ऱा लांजा ) याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी पोलिसांकडून अज्ञात मारेकऱयाविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सुनील याचा खून नेमका कोणी व का केला, या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े दरम्यान शहर पोलिसांकडून सुनील राहत असलेल्या जागेची झाडाझडती घेण्यात आल़ी तर सुनील याच्या सहकाऱयांची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आह़े या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत़