प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर आणि परिसरात अवैध धंदे करण्यासह नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार असलम महंमदहनिफ बाडवाले (रा. झारीबागजवळ, मिरज) याला सांगली आणि कोल्हापूर जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे ही कारवाई केली.
असलम बाडवाले हा शहरातील सराईत गुन्हेगार असून, त्याचे अनेक अवैध व्यवसाय आहेत. याशिवाय तो वारंवार सामान्य नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करीत होता. त्याच्या विरुध्द महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बाडवाले याला प्रतिबंधक करण्यासाठी हद्दपार करावे, असा प्रस्ताव गांधी चौकी पोलिसांनी पाठविला होता.
पोलिसांच्या या प्रस्तावानुसार प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे यांनी असलम बाडवाले याला सांगली, कोल्हापूर जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि अवैध व्यवसायाला आळा बसण्याची शक्यता आहे.