प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील शास्त्री चौक येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलिसांनी पकडला. या कारवाईत इंपिरियल ब्ल्यू दारूचे सात बॉक्स आणि टेम्पो असा 4 लाख, 47 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दारू वाहतूक करणारा टेम्पो चालक अझरुद्दीन मेहबूब मुजावर (वय 33, रा. चौगुले प्लॉट, शास्त्री चौक), अमीन हज्जूकरिम शेख (वय 38, रा. शांता कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
शास्त्री चौक येथे नाकाबंदी सुरू असताना सदर दोघे संशयित टेम्पो क्रमांक (एमएच-43-यु-0680) घेऊन संशयास्पदरीत्या जात होते. पोलिसांनी टेम्पो थांबून झडती घेतली असता, गोवा बनावटीचे इंपिरियल ब्यु दारूचे सात बॉक्स त्यामध्ये 750 मिलीच्या 84 बाटल्या असा 48 हजारांचा दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी दोघाना अटक करून दारू आणि टेम्पो जप्त केली आहे.