प्रतिनिधी /मिरज :
शहरातील मिरसाहेब दर्गा कॉर्नरजवळ दोघा तरुणांनी गांजाची नशा करून चारचाकी पेटवून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मिरज शहर पोलिसांनी इसरत उर्फ इसरतअली इरफान बारगीर (वय 28) आणि रिझवान मिनाजुद्दीन शिकलगार (वय 22, दोघे रा. शास्त्री चौक, मिरज) या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर दोघे तरुण हे गांजाची नशा करतात. बुधवारी रात्री मिरासाहेब दर्गा कॉर्नरजवळ ते गांजा ओढत बसले होते. त्याच नशेत त्यांनी रात्री दोनच्या सुमारास त्यांनी शिफ्ट कंपनीची कार पेटवून दिली.