बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
प्रतिनिधी / मिरज
मिरजेत बसस्थानक परिसरात नरवाडकर पेट्रोलपंपावर बेवारस बॅग व पोते आढळल्याने खळबळ उडाली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाकडून बॅग व पोत्याची तपासणी केली. बॅगेमध्ये कपडे व इतर वस्तू सापडल्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
मिरज बसस्थानक अत्यंत गजबजलेला परिसर असून, समोरील पेट्रोलपंपावर कोणीतरी बेवारस बॅग व पोते ठेवून गेले होते. बेवारस बॅगेमुळे घबराट निर्माण झाली होती. बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी येऊन बॅगेची व पोत्याची तपासणी करली. बॅगेमध्ये कपडे व इतर प्रापंचिक वस्तू आढळल्या. बॅग व पोते पोलिस पथकाने पोलीस ठाण्यात आणले. मात्र या घटनेमुळे काही काळ सर्वाची धावपळ उडाली होती. याबाबत शहर पोलीसात नोंद आहे.