महिलेसह तिघा डॉक्टरांविरोधात तक्रार, डेव्हलपमेंट करण्यास सांगून फसवणूक
प्रतिनिधी / मिरज
शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील आरवट्टगी हॉस्पिटल येथे डेव्हलपमेंट करण्यास सांगून बांधकाम व्यवसायिक संतोष मोहन आरवट्टगी (वय 43, रा. नयम स्पेसेस, पहिला मजला, फ्लॉट नं. 2 कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज) यांची दोन कोटी, पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत संतोष आरवट्टगी यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात धाव घेऊन एका महिलेसह तिघा डॉक्टरांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
संतोष आरवट्टगी यांच्या तक्रारीनुसार, श्रीमती डॉ. सरोजनी सॅम्युअल आरवट्टगी (वय 73, रा. फायन फ्लॉट नं. 3 सांगली रोड, व्हेल मेमोरीयल हॉस्पिटल, गांधी चौक), डॉ. विनय सॅम्युअल आरवट्टगी (वय 51, रा. शंभर फुटी रोड विश्रामबाग) आणि डॉ. सुयोग उर्फ बॉबी सॅम्युअल आरवट्टगी (वय 48, रा. 401/बी, नाझरकर हॉस्पिटल पहिला पॉलवेट, सेंट मेरी स्कुलसमोर चिनचिनीम सालकेट, गोवा) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.