प्रतिनिधी / मिरज
देशाच्या स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतचा मिरज तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. शहरातील महाराणा प्रताप चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत कंगणाच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला. कंगणाने भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याने तिचा पद्म पुरस्कार काढून घेण्याबरोबर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.