प्रतिनिधी/मिरज
शहरातील स्टेशन रोडवर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एका जोडप्याने अचानक धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. रस्त्याच्या मध्यभागी उभारून बराच वेळ या जोडप्याचे भांडण सुरू असल्याने या मार्गावरून जाणारी अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबली होती.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास स्टेशन चौकात हॉटेल किरण समोर एक जोडपे अचानक भांडू लागले. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. शिवीगाळ करीत रस्त्याच्या मध्यभागी चाललेल्या या धिंगाण्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहने थांबली होती. हे जोडपे नेमके कोणत्या कारणास्तव भांडत होते, हे समजू शकले नाही. मात्र, ते मद्यधुंद अवस्थेत असावे, असे सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास रस्त्यात त्यांचा धिंगाणा आणि जोरजोराने शिवीगाळ सुरू होती. यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.