कृष्णा घाटावरील पुलाच्या कामासाठी दहा दिवस रस्त्यावरील वाहतुकीवर येणार निर्बंध
प्रतिनिधी / मिरज
मिरज-अर्जुनवाड-शिरोळ (जि. कोल्हापूर) जा जोडणारा कृष्णा नदीवरील कृष्णाघाट मिरज येथील पूल दुरूस्तीकामी 10 ते 20 जुलै 2021 या कालावधीत सकाळी 11 ते 11.30 या वेळेसाठी वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतुक नियंत्रीत करावी. जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी एकत्रपणे कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.