प्रतिनिधी/मिरज
शहरातील गणेश तलावामध्ये पडून चंद्रकांत लक्ष्मण नाईक (वय 35) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. चंद्रकांत हे दारूच्या नशेत पाण्यात पडल्याचा संशय आहे. मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू आहे.
चंद्रकांत नाईक हे गणेश तलाव परिसरात कुंकूकुंकूवाली गल्ली येथे राहण्यास आहेत. ते गणेश तलाव परिसरात त्यांची नेहमी वर्दळ असते. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत हे शुक्रवारी दुपारी दारूच्या नशेत होते. सकाळ पासूनच ते घराच्या बाहेरच होते. दुपारी ते गणेश तलावाच्या पाण्यात तरंगत असताना येथील रहिवाशांना दिसले. याबाबत चंद्रकांत नाईक यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. नाका-तोंडात प्रचंड पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेतच ते पाण्यात पडल्याचा संशय आहे. मिरज शासकीय रुग्णालयात त्यांच्या शवविच्छेदन करण्याचे काम सुरू आहे.