कसबे डिग्रज / वार्ताहर
मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. कसबे डिग्रजमधील महावितरणच्या पाठीमागील बाजूस कल्याण जोशी यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांच्या गोठ्या नजीक ठसे आढळून आले आहेत. वनविभागाला याबाबत कळवण्यात आले आहे. गावातील शेतकरी महिलेने सकाळी अकाराच्या सुमारास बिबट्या दिसला. शेतात काम करीत असताना त्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी शेतातून पळ काढला.
दरम्यान कसबे डीग्रजसह आणि अलकुड परिसरातही काही दिवसांपूर्वी बिबटया आढळला होता. तर तासगाव ते तानंग रस्त्यावरील मानमोडी फाटयाजवळच्या ओढयालगत शुक्रवारी रात्री बिबटया आल्याच्या चर्चेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. मात्र, पायाचे ठसे आणि विष्ठेवरुन तानंगनध्ये दिसलेला बिबटया न्हवे, तर तरस आहे, असा दावा सांगलीच्या वनविभागाने केला आहे. खात्रीशिर माहिती नसताना बिबटयाबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जावू नये, असे आवाहन सांगलीच्या वन अधिकाऱ्यांनी केले आहे. आता पुन्हा कसबे डिग्रजमध्ये पुन्हा बिबट्याच्या दर्शनाचे वृत्त पसरल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.