प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल हाती आला आहे. १७ पैकी १२ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला. 207 पैकी 136 भाजपा उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले. या निकालामुळे तालुक्यातील भाजप आमदार सुरेश खाडे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. पैकी १७ ग्रामपंचायती या भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या मिरज विधानसभा मतदारसंघात येतात. यातील म्हैसाळ, आरग, लिंगनूर, ढवळी, मालगाव, एरंडोली, तानंग, चाबूकस्वारवाडी, डोंगरवाडी, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, विजयनगर या १२ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला.
मल्लेवाडी येथे भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष असे एकत्रित पॅनल विजयी झाले आहे. त्यामुळे येथेही भाजप सत्तेत असणार आहे. तर कवलापूर, भोसे, कळंबी आणि शिपुर येथे भाजपला अपेक्षित यश मिळाले नसून याठिकाणी विरोधाची सत्ता आली आहे. या १७ गावात मिळून २०७ सदस्य संख्या होते, यापैकी भाजपच्या निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १३६ आहे.