प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीचे प्रभारी सभापती म्हणून म्हैसाळचे दिलीपकुमार जयकुमार पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी पदभार दिला. सुनिता पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेवर दिलीपकुमार पाटील हे प्रभारी सभापती म्हणून आता काम करणार आहेत.
सध्या मिरज तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतरच पंचायत समिती नुतन सभापतींची निवड केली जाणार आहे. नुतन सभापती पदासाठी त्रिशैला खवाटे, गीतांजली कणसे आणि सुमन भंडारे यांनी हक्क सांगितला आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच नव्या सभापतीची निवड केली जाणार असल्याने तोपर्यंत दिलीपकुमार पाटील हेच प्रभारी सभापती म्हणून काम पाहणार आहेत.