समिती प्रवेशद्वारासमोर सत्ताधारी भाजपा सदस्य, पदाधिकाऱ्यांची धरणे
प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अप्पासो सरगर हे मनमानी कारभार करीत आहेत. यामुळे गावच्या विकासाला खिळ बसण्याबरोबर राजकीय संघर्ष पेटू लागला आहे, असा आरोप करीत बुधगांव, एरंडोलीतील ग्रामस्थांनी मंगळवारी पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱयांत चर्चा घडवून आणली. त्यामुळे हे आंदोलन तात्पूरते स्थगित करण्यात आले.उद्या याच विषयावर सकाळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.