प्रतिनिधी/ बागणी
रोझावाडी येथील माजी उपसरपंच यांचा मिरज येथील कोविड सेंटरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बागणी परिसरातील शिगाव, फाळकेवाडी नंतरचा हा तिसरा बळी आहे.
माजी उपसरपंच हे कोरोना बाधित झालेल्या पोलीस कुटुंबाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांना इस्लामपूर येथे कोविड सेंटर येथे ठेवण्यात आले होते. त्यांना अधिकचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मिरज येथे हलवण्यात आले होते. या ठिकाणी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. माजी उपसरपंच यांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन सरपंच प्रतिनिधी मोहिद पिरजादे यांनी केले आहे.