प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे मुलाने वडिलांना घर सोडून जाण्यास सांगत वडिलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत विलास तुकाराम पवार (वय 58 राहणार साईनगर कॉलनी, सुभाषनगर) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, मुलगा सुनील विलास पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
विलास पवार आणि त्यांचा मुलगा सुनील हे दोघे साईनगर कॉलनी ते एका घरात राहण्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुनील हा दारू पिऊन वडिलांचा वारंवार छळ करतो आहे, तसेच घर सोडून जाण्यास सांगून मारहाण करीत होता. मात्र वडील घर जात नव्हते. त्यामुळे मुलाने त्यांचा गळा दाबून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.