कपिलेश्वर तलावात 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदा श्री विसर्जन मिरवणूक झाली नसली तरी विसर्जनाची प्रक्रिया तब्बल 12 तास चालली. कपिलेश्वर परिसरातील दोन्ही तलावांत 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. मिरवणूक नसली तरी गणेश भक्तांच्या उत्साह काही कमी नव्हता.
उपलब्ध माहितीनुसार नव्या तलावांत 77 व जुन्या तलावांत 33 असे एकूण 110 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पहिल्या व रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास शेवटच्या श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. शेवटी महानगरपालिकेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.