प्रतिनिधी /पणजी
मिरामार रोटरी क्लबच्या 2021 – 22 च्या संचालक मंडळाचे अधिकारग्रहण नुकतेच संपन्न झाले.क्लबतर्फे डॉक्टर दिवसाच्यानिमित्तान 16 डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला तर चार्टर्ड अकाऊंटंट दिवसाच्या निमित्ताने 3 चार्टर्ड अकाऊंटंटसचा सत्कार सोहळा करण्यात आला. त्यानंतर क्लबतर्फे पणजीतील भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.
मिरामार रोटरी क्लबचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – स्नेहलता एस. पेडणेकर, सचिव – सागर कुलकर्णी, खजिनदार – सिद्धार्थ देशपांडे, उपाध्यक्ष मनिषा सरदेसाई, प्रेसिडेंट इलेक्ट – प्रीती शेठ, माजी अध्यक्ष – कमलेश अमलानी, सोनाली नागवेकर, नताशा पारेख ई सिमॉईश, सीया नावेलकर, अंशुल सिंघल, पम्मी सिंग बिलोचपुरा, मेघा हरमलकर व निकिता रायकर.