मिर्झापूरच्या तिसऱया सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. पण याचदरम्यान मिर्झापूरमध्ये गोलू गुप्ता ही व्यक्तिरेखा साकारणारी श्वेता त्रिपाठी कोरोना काळात वाराणसी येथे एक नवी वेब सीरिज ‘एस्केप लाइव्ह’चे चित्रिकरण् आहे.
ही वेब सीरिज स्वतःच्या जीवनात काहीतरी करण्यासाठी बेचैन असलेल्या 5 भारतीय व्यक्तिरेखांवर आधारित असल्याचे श्वेताने म्हटले आहे. कोरोनामुळे चित्रिकरणातील सर्व सदस्य अत्यंत दक्ष आहेत. सर्व दिशानिर्देशांचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात असल्याचे तिने सांगितले आहे.
सुमारे 40 अंश तापमानात हे चित्रिकरण करावे लागत आहे. वाराणसीपूर्वी वेब सीरिजचे चित्रिकरण भोपाळ आणि पतियाळात पार पडले आहे. तर काही दृश्ये मुंबईत चित्रित झाली आहेत.
मिर्झापूर सीजन 2 नंतर निर्माते रितेश सिधवानी यांनी तिसऱया सीजनचे संकेत दिले होते. मिर्झापूर 2 ला प्रदर्शनाच्या पहिल्या आठवडय़ात 180 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रेक्षक लाभले होते. सुमारे 50 टक्के प्रेक्षकांनी पूर्ण सीझन पाहिला आणि 2 दिवसांमध्ये याला ‘बिंज-वॉच’ केले म्हणजेच कुठल्याही ब्रेकशिवाय ही सीजन पाहिला आहे.