प्रतिनिधी / दापोली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सहाय्य्क मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुड येथील नवीन बंगल्याच्या बांधकामबाबत तक्रार झाल्यावर त्यांनी रविवारी स्वतःच आपला बंगला पाडून टाकण्याचे काम सुरु केले. हे काम रविवारी सायंकाळ पर्यंत सुरु होते. दापोली येथील मुरुड येथे मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
महसूल विभागाकडून कारवाई नाही
याबाबत मुरुडचे मंडल अधिकारी दिलीप शिगवण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला या प्रकाराबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. शिवाय नार्वेकर यांच्या बंगला तोडून टाकण्याबाबत महसूल विभागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे महसूल विभागाने ही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सदर बंगला हा मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडण्याचे काम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.