प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिलिटरी पॅन्टीनसाठी मालाची आवश्यक्ता असल्याचे सांगून रत्नागिरीमधील व्यापाऱयाला ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आह़े आपली फसवणूक होत असल्याचे वेळीच या व्यापाऱयाच्या लक्षात आल्याने या फसवणूकीतून बालंबाल बचावल़े अशा प्रकारे फसवणूकचे प्रकार समोर येत असून कोणालाही आपले बँक खात्याची माहिती उघड करून नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े
रत्नागिरी मधील क्लासिक फूडचे मालक ड़ि एन कुलकर्णी असे या व्यापारऱयाचे नाव आह़े शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर मनजित सिंग नामक व्यक्तीचा फोन आला होत़ा यावेळी त्याने मिलिटरी मधून बोलत असून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरीत मिलिटरी पॅम्प सुरू होत आह़े मिलिटरीच्या पॅन्टीनसाठी दुध, दही व पनीर आदी पदार्थ पॅन्टीनसाठी लागणार असल्याचे सांगितल़े सोबत आपले ओळखपत्र व्हॉटसऍप केले होत़े
मनजीत याच्यासोबत झालेल्या बोलण्यानुसार रविवारी सकाळी कुलकर्णी यांनी ऑर्डर तयार करून ठेवली होत़ी यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मनजीत यांनी कुलकर्णी यांच्याकडे बँक खात्याची डिटेल्स मागितल़ी त्यानुसार बँक डिटेल मनजित याला पाठविण्यात आल़ी मात्र पैसे जमा होण्याऐवजी त्यांना पैसे कमी होणार असल्याचा मेसेज व ओटीपी आल़ा त्यावेळी काहीतरी गडबड असल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आल़े
कुलकर्णी यानी तुम्ही रोख पैसे देवून आपली ऑर्डर घेवून जा असे मनजित यांला सांगितल़े मात्र तुमच्या मोबाईलमध्ये आलेला मेसेज आम्हाला पाठवा नाहीतर ऑर्डर रद्द करा असे सांगितल़े दरम्यान कुलकर्णी यांनी अधिक चौकशी केली असता हा सर्व फ्रॉड असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े या फसवणूकीतून आपण बचावलो असून सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आह़े