वृत्तसंस्था/चंदीगड
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची बाधा झाल्याने येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
3 जून रोजी मिल्खा सिंग यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्यात 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना मोहालीतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये कोरोना समस्येमुळे ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात त्यांना मोहालीच्या रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान त्यांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने तातडीने चंदीगडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांची पत्नी 82 वर्षीय निर्मल कौर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर फोर्टीस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय इलाज सुरू आहे.