ग्लोबल हार्टथ्रोब मिशेल मोरोन जगभरातील अनेक लोकांसाठी मेन ऑफ द ड्रीम आहे. ‘365 डे’ चित्रपटात स्वतःच्या हॉट लुक्सनी चाहत्यांना घायाळ करणाऱया मिशेलचे भारतातही मोठय़ा संख्येने प्रशंसक आहेत. याचमुळे तो लवकरच बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसून येऊ शकतो. चित्रपट किंवा वेब शोकरता त्याच्यासोबत सध्या बोलणी सुरू आहेत.
करण जौहरने मिशेलला एका चित्रपटाचा प्रस्ताव दिला आहे. करणच नव्हे तर आणखीन दोन दिग्गज निर्मात्यांनी बिगबजेट चित्रपटांकरता मिशेलशी संपर्क साधला आहे. नेटफ्लिक्सवरील चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मिशेलने जगभरात ओळख निर्माण केली आहे. त्याचा ‘365 डे’ हा चित्रपट नेटफ्लिक्स इंडियावर अद्याप टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. अभिनेता सध्या ‘365 डे’च्या सीक्वेलचे चित्रिकरण करत आहे.