कंबरेत रिव्हॉल्वर खोचताना दिसली गृहिणी
ऑनलाईन टीम / मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटात गुप्तहेराची व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. इंदू की जवानी चित्रपटाचे दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यांनी निर्मात्याच्या स्वरुपात नवी जबाबदारी हाती घेतली आहे. तर या चित्रपटासह लेखिका-निर्मात्या अनुश्री मेहता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. चित्रपटात राधिकासह अभिनेता सुमीत व्यास दिसून येणार आहे. चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून यात राधिका एका गृहिणीच्या रुपात दिसत असून ती कंबरेत बंदूक खोचत असताना दिसून येते.
बंदुकीसह एक भारतीय गृहिणी किती डेडली कॉम्बिनेशन आहे ना? नवा चित्रपट एक स्पाय-एंटरटेनर असून यात गुप्तहेराची भूमिका साकारत असल्याचे राधिकाने सोशल मीडियावर म्हटले आहे.