लैंगिक भेदभाव मिटविण्याचा प्रयत्न, अमेरिकेच्या खेळणी उत्पादक कंपनीचा निर्णय
लोकांनी ‘ब्रो’ शब्द हटविण्याची केली मागणी
अमेरिकेतील प्रसिद्ध खेळणी असलेल्या मिस्टर पोटॅटो हॅडमधून आता ‘मिस्टर’ शब्द हटला आहे. याची निर्मिती करणारी कंपनी हॅसब्रो या खेळणीला आता ‘पोटॅटो हेड’ नावाने प्रचारित करणार आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर समाजमाध्यमांवर पोटॅटो हेड ट्रेंड करू लागला आहे. कंपनीने आता स्वतःच्या नावातूनही ‘ब्रो’ शब्द हटवावा असे लोक आता म्हणू लागले आहेत. कंपनीच्या या निर्णयामागे अधिक सर्वसमावेशक होणे आणि लैंगिक भेदभाव मिटविणे ही कारणे असल्याचे उद्गार कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा किम्बेरले बॉयर्ड यांनी काढले आहेत.
मिस्टर पोटॅटो हेड खेळण्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. यात शरीराचे अंग म्हणजेच डोळे, नाक-कान यांच्यासह अन्य ऍक्सेसरीज म्हणजेच टोपी इत्यादीला प्लास्टिकच्या पोटॅटोमध्ये ठेवण्यात येत. कंपनीने 1952 मध्ये मिस्टर पोटॅटो हॅड तयार केला होता. तेव्हा कंपनी खेळणीच्या स्वरुपात केवळ शरीराचे अंग तयार करत होती. मुले घरात खराखुरा बटाटा किंवा अन्य भाज्यात ते बसवत होती. त्यानंतर कंपनीने प्लास्टिकचे पोटॅटो तयार करणे सुरू केले. टीव्हीवर जाहिरात प्रसारित होणारी अमेरिकेतील ही पहिलीच खेळणी होती.
पण कंपनीने स्वतःची एक खेळणीची जोडी मिस्टर अँड मिसेस हेडचे नाव बदलले नाही. हॅसब्रो मुलांच्या खेळण्यांना आता खऱया अर्थाने एक आकार देत आहे. पारंपरिक कालबाहय़ लैंगिक मान्यतांना दूर सारून मुले आता स्वतःच यातील भेदभाव संपवतील असे उद्गार एका संस्थेने काढले आहेत. मागील काही वर्षांमध्ये अनेक खेळणी उत्पादकांनी स्वतःच्या ब्रँडसची नावे बदलली आहेत. उदाहरणार्थ बार्बी डॉल आता केवळ गोऱया रंगात नव्हे तर त्वचेच्या सर्व रंग आणि शारीरिक आकारात उपलब्ध होते.