अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया डिसूजा पुन्हा एकदा एका चित्रपटात सोबत दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘मिस्टर मम्मी’ आहे. यासंबंधीची माहिती जेनेलियाने सोशल मीडियावर दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत असून टी-सीरिज अंतर्गत याची निर्मिती होतेय.
रितेश आणि जेनेलिया यांच्या विवाहाला 3 फेब्रुवारी रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशावेळी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट विनोदी धाटणीचा असणार आहे. अपत्याबद्दल परस्पर विरोधी विचार असणाऱया जोडप्यावर याची कहाणी बेतलेली असणार आहे. पुरुष गरोदर राहिल्यास काय होईल या काल्पनिक विचारावर हा चित्रपट असणार आहे.
रितेश आणि जेनेलिया यांनी यापूर्वी 2012 मध्ये तेरे नाल लव्ह हो गया या चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांचेही बॉलिवूडमधील पदार्पण देखील एकत्रित मुझे तेरी कसम या चित्रपटाद्वारे 2003 साली झाले होते. त्यानंतर दोघेही 2004 मध्ये मस्ती या चित्रपटात दिसून आले होते. जेनेलियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.