बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्वतःच्या अभिनयासह सौंदर्य आणि जबदरस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील तिचे लाखो चाहते आहेत. अलिकडेच उर्वशीला दुबईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. उर्वशी पुन्हा एकदा विदेशात स्वतःचा ठसा उमटविणार आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहण्याचे निमंत्रण उर्वशीला मिळाले आहे.
मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा 12 डिसेंबर रोजी आयोजित होणार आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. उर्वशीला मोठी जबाबदारी अन् मान मिळाल्याने तिचे चाहते अत्यंत आनंदी झाले आहेत. चाहत्यांकडून सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे.
उर्वशीने यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्वतःचा ठसा उमटविला आहे. उर्वशी लवकरच ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुतु पायले 2’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तसेच एका वेबसीरिजमधूनही ती झळकणार आहे.