ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मिस युनिव्हर्स हरनाज संधुने नुकतंच एक ट्विट केलं असून यात तीने आपली इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणते कि, मला एक सामान्य अभिनेत्री व्हायचे नाही, तर मला एक प्रभावशाली अभिनेत्री व्हायचे आहे. तसेच सशक्त पात्र निवडत स्त्री काय आहे आणि ती काय करू शकते हे दाखवुन द्यायचे आहे. तसेच स्त्री रूढीवादी विचार तोडू शकते. हे मला माझ्या अभिनयाने लोकांना दाखवून द्यायचे आहे. तसेच लोकांना प्रेरित करायचे आहे. असे संधूने म्हटले आहे.
हरनाजने या पुर्वी ही आपल्या स्त्री सक्षमीकरणासाठी भरीव काम करण्याची इच्छा बोलुन दाखवली होती. तसेच तीची मिस युनिव्हर्ससाठी अंतिम फेरीत निवड झाल्यानंतर ही युवकाबद्दल भाष्य केले होते. त्यामुळे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भुमिका बजाणार आहेच. मात्र याबद्दल तीने पुन्हा मांडलेल्या भुमिकेने यावर शिक्कामोर्तब ही झाले आहे.
कोण आहे हरनाझ संधू ?
हरनाझ संधू मुळची चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीतील हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या चित्रपटात ही काम केले आहे. तिने या पुर्वी अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजयश्री ही खेचुन आणली आहे. त्याशिवाय तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तर तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.
हरनाझ संधूने यापुर्वी मिळवलेले महत्त्वाचे किताब
2017 – टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 – मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 – फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 – मिस युनिवर्स इंडिया