ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील मीरारोडच्या शीतल नगरमध्ये असलेल्या शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बार मालकाने गुरुवारी रात्री उशिरा मीरारोड पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
हरेश शेट्टी (वय 48) व नरेश पंडित (52) अशी हत्या झालेल्या दोन बार कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये असलेल्या बारमधील पाण्याच्या टाकीत या दोन्ही कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले. बामालकाने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. दोन्ही मृतांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.