प्रतिनिधी / पणजी
सध्यस्थितीत मी स्वतःच काँग्रेसमध्ये राहिन की नाही याबद्दल मीच साशंक आहे, अशावेळी काँग्रेस नेतृत्वासंबंधी बोलण्याचा अधिकार मला नाही. मी स्वतः कोणत्याही पदासाठी इच्छूक नाही आणि मागणीही करणार नाही. निरीक्षक राव यांनी सर्वांना भेटणार असे स्पष्ट केलेले आहेच, त्यामुळे तेच काय तो निर्णय देतील, असे मत दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.